RCB vs RR :आरसीबी चा राजस्थान वर दणदणीत विजय ७ धावांनी दणदणीत विजय

23/04/2023: आरसीबीने विजयासाठी ठेवलेल्या 190 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानला पहिल्याच षटकात मोठा धक्का बसला. धडाकेबाज फलंदाज जॉस बटलरला मोहम्मद सिराजने शुन्यावर बाद केले. मात्र त्यानंतर राजस्थानने सावध सुरूवात करत भागीदारी रचण्यावर भर दिला. यशस्वी जैसवाल आणि देवदत्त पडिक्कल यांनी राजस्थानला 10 षटकात 92 धावांपर्यंत मजल मारून दिली.

RCB vs RR :आरसीबी चा राजस्थान वर दणदणीत विजय ७ धावांनी दणदणीत विजय 

पहिल्या 10 षटकात राजस्थानाल 92 धावांपर्यंत पोहचवल्यानंतर देवदत्त पडिक्कलने आपले अर्धशतक पूर्ण केले. ही जोडी शतकी भागीदारी रचणार असे वाटत असतानाच डेव्हिड विलीने 34 चेंडूत 52 धावा करणाऱ्या पडिक्कलला बाद केले.

देवदत्त पडिक्कल बाद झाल्यानंतर 37 चेंडूत 47 धावा करणारा यशस्वी जैसवाल देखील बाद झाला. त्याची शिकार हर्षल पटेलने केली. पाठोपाठ संजू सॅमसन देखील 22 धावा करून माघारी परतला. त्यालाही हर्षल पटेलनेच बाद केले. पाठोपाठ दोन विकेट पडल्याने राजस्थानची धावगती मंदावली. त्यात हेटमायर (3) देखील धावबाद झाला.

अखेर सामना 12 चेंडूत 33 धावा असा आला होता. अश्विन आणि जुरेल स्ट्राईकवर होते. मोहम्मद सिराज टाकत असलेल्या 19 व्या षटकात पहिल्या चार चेंडूत 5 धावा झाल्या. त्यानंतर पाचव्या चेंडूवर जुरेलने षटकार मारला तर पुढच्या चेंडूवर 2 धावा केल्या. यामुळे सामना आता 6 चेंडूत 20 धावा असा आला.


हर्षलले टाकलेले शेवटचे षटक असे...

6 चेंडूत 20 धावा - पहिल्या चेंडूवर अश्विनने मारला चौकार

5 चेंडूत 16 धावा - अश्विनने दोन धावा पळून काढल्या

4 चेंडूत 14 धावा - अश्विनने हर्षलला चौकार मारला

3 चेंडूत 10 धावा - अश्विन झेलबाद झाला

2 चेंडूत 10 धावा - बसीतने 1 धावा केली.

1 चेंडूत 9 धावा - ध्रुव जुरेलने 1 धाव केली.

आरसीबने 7 धावांनी सामना जिंकला.

तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करणाऱ्या रॉयल चॅलेंजर बेंगलोरने खराब सुरूवातीनंतर 15 षटकात 156 धावांपर्यंत मजल मारली होती. त्याचवेळी आरसीबी 200 पार धावसंख्या उभारेल असे वाटत होते. मात्र राजस्थान रॉयल्सने शेवटच्या 5 षटकात आरसीबीचे 4 फलंदाज बाद करत त्यांना 189 धावात रोखले.


आरसीबीकडून फाफ ड्युप्लेसिस (62) आणि ग्लेन मॅक्सवेल (77) यांनी तिसऱ्या विकेटसाठी 127 धावांची भागीदारी रचली. राजस्तानकडून ट्रेंट बोल्ट आणि संदीप शर्मा यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या तर यशस्वी जैसवालने दोन धावबाद केले. 

Post a Comment

0 Comments